खरबदार यानंतर कॉपी कराल तर 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 कोटींचा दंड
जयपूर / प्रतिनिधी : अनेक वेळा विविध परीक्षांमध्ये कॉपी करण्याचा प्रकार दिसून येतो. मात्र अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राजस्थान सरकारने कायदा मंजूर केला आहे. स्पर्धा परीक्षांसह कोणत्याही सार्वजनिक परीक्षामध्ये कॉपी केल्याचे सिद्ध झाल्यास पाच ते दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि कॉपी करणाऱ्यास मदत करणाऱ्यांना तुरुंगवासह 10 लाख 10 कोटींचा दंड ठोठावला जाईल.
राजस्थान सरकाचे कॉपी विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यानुसार कॉपी बहाद्दर आणि त्यांना मदत करणाऱ्या टोळीत असलेल्यांची मालमत्ता ही जप्त करण्यात येणार आहे. पेपर लीक प्रकरणांमध्ये परीक्षार्थीने पेपर खरेदी केल्याचे सिद्ध झाल्यास तीन वर्षाच्या तुरुंगवासाची ही शिक्षा मिळू शकते.
यापूर्वी 1992 मध्ये केलेल्या कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद नाही उत्तर प्रदेशामध्ये कॉपीबहाद्दरांनावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. या निर्णया अंतर्गत राजस्थान सरकारच्या सर्व स्पर्धा परीक्षा शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या परीक्षांचा कायद्यात समावेश करण्यात आला आहे.
bargal
