संभाजीनगरात शिक्षकच बनला भक्षक १० वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार

संभाजीनगरात शिक्षकच बनला भक्षक  १० वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार

संभाजीनगर/प्रतिनिधी - पालक अतिशय विश्वासाने आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात परंतु त्यांच्यासोबत दुष्कृत्य घडल्यावर मुलांना शिक्षण द्यावे की नाही हाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना संभाजी नगरात घडली आहे. रांजणगाव शेपुं येथील खाजगी क्लासेस च्या शिक्षकाने एका 10 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे दुर्दैवी वृत्त नुकताच समोर आले आहे.
रांजणगाव शेपू येथील नर्सरी कॉलनीमध्ये खाजगी शिकवणी असलेल्या टॉपर क्लासेसच्या ४५ वर्षीय शिक्षकाने चौथीमध्ये शिकत असलेल्या १० वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आज दि १५ जून रोजी सकाळी उघड झाली आहे. सुभाष जाधव (वय ४५ शिवनेरी कॉलनी रा रांजणगाव शेपुं. )असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, दीड वर्षापासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस नावाने शिकवणी आहे. एम ए इंग्रजी एम एड असलेल्या सुभाष जाधव व इतर दोन शिक्षक असे तिघे मिळून या ठिकाणी शिकवत होते. तीन दिवसापूर्वी सुभाष जाधव या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवून बलात्कार केला आणि हा सर्व प्रकार घरी सांगितला तर आई वडिलाचे तुकडे करेल अशी धमकी दिली. मुलगी क्लासला जात नसल्याने आई वडिलांनी विचारपूस केली असता मुलीने सर्व हकिकत सांगितली. घटना माहीत होताच मुलीच्या नातेवाईकाने नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शाळेतून काढून टाकले होते
सुभाष जाधव हा रांजणगाव शेपू येथील एका खाजगी शाळेत शिकवत होता परंतु शाळेत सुभाष च्या गैर वर्तनामुळे त्याला शाळेने काढून टाकले होते. त्यानंतर त्याने खाजगी शिकवणी सुरू केली होती अशी माहिती समोर आली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा