तेच नेते, तेच आश्वासन आणि तीच कचरामय परिस्थिती

तेच नेते, तेच आश्वासन आणि तीच कचरामय परिस्थिती

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी :- बजाज नगर वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद निवडणूक गट क्रमांक 50 आणि 51 मध्ये विविध पक्ष आणि उमेदवार यांच्यापेक्षा नोटा ला मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजवणार अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे.  तेच पक्ष तेच नेते आणि तीच आश्वासन या व्यतिरिक्त कुठलाही बजाज नगरचा विकास होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये अशी चर्चा होत आहे.


जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात चुरशीची लढत असलेल्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर गट क्रमांक 50 आणि 51 मध्ये कमी जागेत जास्त लोक वस्ती असलेला गजबजलेला परिसर या परिसरात दोन जिल्हा परिषद सदस्य आणि चार पंचायत समिती सदस्य निवडणुकीद्वारे निवडून दिले जातात, गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात विविध समस्यांचा डोंगर उभा आहे.  यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे चौका चौकात आणि गल्लेबोळात साचलेले कचऱ्याचे ढीग, ड्रेनेज लाईन अपूर्ण असल्यामुळे रस्त्यावर वाहणारे सांडपाणी,  स्वच्छ व सुंदर बजाजनगर करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र विविध निवडणुकांमध्ये विविध पक्षाची उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात असणारे तेच उमेदवार,  तेच पक्ष, तीच आश्वासन आणि पुन्हा बकाल झालेला बजाजनगर वडगाव कोल्हाटी परिसर आहे. आठ दिवस विकास हा जिवंत होतो आणि जवळपास पावणे पाच वर्ष विकास हा कोमात गेलेला असतो.  त्यामुळे या निवडणुकीत मतदार उमेदवारांकडे कानाडोळा करून नोटा ला मतदान करतील अशी चर्चा मतदारांमध्ये होत आहे.

मागील पाच वर्षात स्वच्छ सुंदर बजाजनगर करायला काय अडचण 
मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि पक्ष पुन्हा रिंगणात मग यापूर्वी कचरा साफ का नाही झाला
मागील जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी काही उमेदवार आणि पक्षांवर विश्वास ठेवून त्यांना विजयी केले होते मात्र गेल्या पाच सात वर्षात बजाज नगरातील कचरा व ड्रेनेज लाईन याशिवाय विविध समस्या सोडविण्यात विजयी उमेदवार आणि त्यांचा पक्ष असमर्थ ठरला आहे यामधील काही विजय उमेदवार पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत तर काही पक्ष त्यांचे नवीन उमेदवार घेऊन निवडणूक रिंगणात आहेत निवडणुकीपुरती आश्वासन आणि पाच वर्ष पुन्हा कचराकुंडी कचरा घाणीचे साम्राज्य सात रोगांचा आजार यामध्ये मतदारांनी सहन करत राहावे आठ दिवसाचा प्रचार आठ दिवस आश्वासन आणि उर्वरित पाच वर्ष कोमात गेलेला विकास नावाचा शब्द हेच फक्त मतदार राजाच्या नशिबी आलेले आहे

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा