रबर कंपनीला भीषण आग
मुंबई /प्रतिनिधी - तुर्भे एमआयडीसी परिसरातील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडल्याचे कळते.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
धुराचे उठलेले लोट पाहता ही आग खूप मोठी असल्याचा अंदाज आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसरातील नागरिकांना बाहेर काढत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
ठाणे, नवी मुंबई महापालिकेच्या 5 च्या वर अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या तरी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेली कंपनी ही रबरची कंपनी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सध्या कंपनी परिसरात आगीचे लोळ उठलेले पाहायला मिळत आहेत. तसंच आजुबाजूच्या परिसरात मोठ्याप्रमाणात आगीच्या झळा जाणवत आहेत. सध्या आग कशामुळे लागली आहे आणि त्यात कोणी अडकले आहे का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
bargal
