हायटेक बजाज नगर करण्यासाठी हनुमान भोंडवे यांना विजयी करा - पालकमंत्री संजय शिरसाठ

हायटेक बजाज नगर करण्यासाठी हनुमान भोंडवे यांना विजयी करा - पालकमंत्री संजय शिरसाठ

संभाजीनगर /प्रतिनिधी
मी आमदार झाल्यापासून बजाज नगर परिसराचा विकास करत आलो आहे बजाज नगर मध्ये चांगले रस्ते स्वच्छ पाणी सोसायटीमधील अंतर्गत रस्ते करून झाले आहे. आता मला हायटेक बजाज नगर करायचा आहे यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीतील गट क्रमांक 51 चे उमेदवार हनुमान भोंडवे आणि पंचायत समितीच्या दोन सदस्यांना निवडून द्या. असे आवाहन राज्याचे न्याय व सामाजिक मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी बजाजनगरातील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.


यावेळी बोलताना शिरसाठ म्हणाले की, मी आमदार झाल्यापासून गेल्या पंधरा वर्षात मी बजाजनगरच्या विकासावर काम केले. चांगले रस्ते तयार केले पेव्हर ब्लॉक बसवले, सोसायटीमधील अंतर्गत रस्ते करण्यात आले. शिवस्मारकाचे काम मार्गी लावले, मोहटा देवी मंदिराजवळ सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्यात आला. वडगाव मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला यासह अनेक विकास काम केली. मला यानंतर बजाजनगर हायटेक करायचे आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते दोन्ही बाजूने पथदिवे आणि मुबलक प्रमाणात माझ्या कामगार बांधवांना पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी हनुमान भोंडवे, मोहिनी ढमढेरे आणि बाळासाहेब गाडे या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केले.


बजाजनगरचा चेहरा मोहरा बदलणार.. बजाजनगर हे माझे कुटुंब आहे.. समोरच्या उमेदवारावर बोलण्यापेक्षा आपले काम बोलते. 

यावेळी विकास जैन, त्र्यंबक तुपे विनोद बनकर, हाळनोर अण्णा, हर्षदा ताई शिरसाट विजयाताई शिरसाट ग्रामपंचायत सदस्य मंदा भोकरे सुरेखा लगड, उषाताई हांडे जयश्री घाडगे कांता चव्हाण श्रीकांत साळे अशोक लगड, बबनराव सुपेकर कैलास भोकरे विजय उखळे, ईश्वर जाधव, कैलास चव्हाण, देविदास जाधव, प्रफुल भोसले, योगेश साळे, महेश भोंडवे, भीमराव गव्हाणे समाधान कापरे, पंडित नवले, गोरख शेळके दत्तात्रय खैरे रावसाहेब शिंदे म्हातारदेव गव्हाणे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा