पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आज बजाजनगरात जाहीर सभा
संभाजीनगर /प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती
निवडणुकीच्या प्रचाराने परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून रोज सभा, बैठकांचा धडाका सुरू आहे. आज सायंकाळी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज, दि. २ फेब्रुवारी रोजी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांची मोहटादेवी परिसरातील शिवस्मारक येथे सायंकाळी ठीक ६ वाजता भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे बजाजनगर परिसरातील राजकीय हालचालींना अधिक वेग आला असून पंकजाताई मुंडे या सभेत काय भूमिका मांडणार, कोणते मुद्दे उपस्थित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप पुरस्कृत जि .प उमेदवार सचिन गरड, कांचन विष्णुपंत खेडकर , पंचायत समिती चे उमेदवार लक्ष्मण लांडे , अश्विनी गवळी, राजेंद्र अवतारे, रमेश बागुल यांनी केले आहे. भाजपकडून या सभेला मोठे महत्त्व दिले जात असून सभेच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्ते तयारीत गुंतले आहेत.
दरम्यान, या सभेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
PCN Live
