बजाजनगर वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 50 ची जागेवर भाजप पुन्हा झेंडा फडवणार ?

बजाजनगर वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 50 ची जागेवर भाजप पुन्हा झेंडा फडवणार ?

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये भारतीय जनता पार्टी - शिवसेना युती विस्कटली यामध्ये काही ठिकाणी शिवसेनेने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले. काही ठिकाणी भाजपाने त्यांच्यासमोर पुरस्कृत म्हणून काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला, त्यामुळे ही निवडणूक राज्यात सरकार असलेल्या दोन पक्षांमध्येच आमने-सामने लढण्याची वेळ आली आहे. यामध्ये बजाजनगर वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 50 मध्ये भाजपाच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने एबी फॉर्म देऊन उमेदवार उभे केल्यामुळे पूर्वी ज्या जागेवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. त्याच गटात भाजपा पुन्हा एकदा आपला जिल्हा परिषदेचे उमेदवार विजयी करण्यात यशस्वी होईल का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी जाहीर सभा घेऊन आपले शक्ती प्रदर्शन केले त्यावरून असे दिसते की ही जागा पुन्हा ताब्यात घेण्यास भाजपाने पूर्ण तयारी केली आहे.


बजाज नगर वडगाव कोल्हाटी गट क्रमांक ५० मध्ये मागील निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या रेखा नांदुरकर यांना विजयी केले होते त्यामुळे या जागेवर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दावा होता युतीमध्ये सुद्धा ही जागा भाजपाला सोडण्यात आली होती मात्र शिवसेनेने ऐनवेळी भाजपाला विश्वासात न घेता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटप केले गट क्रमांक 50 मध्ये भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढल्यानंतरही ही जागा भाजपाने जिंकली होती यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाने आपले जिल्हा परिषदेला  उमेदवार कांचन विष्णुपंत खेडकर आणि पंचायत समिती उमेदवार राजेंद्र अवतारे आणि रमेश वाहूळ हे दोन उमेदवार असे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहे या उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजप आपल्या जीवाचे रान करत आहे यासाठी त्यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांची सभा घेतली या सभेला मतदार आणि नागरिकांनी दिलेला भरघोस पाठिंबा यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे या गटामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे मात्र आजही या गटातील मतदार मात्र भाजपाच्या पाठीशी असल्याचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नेते सांगत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी आपली ही जागा पुन्हा ताब्यात ठेवण्यात यशस्वी होईल का असाही एक प्रश्न उपस्थित केला जात आहे

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा