विवेकानंद महाविद्यालयात   पदवीदान समारंभ संपन्न

विवेकानंद महाविद्यालयात   पदवीदान समारंभ संपन्न

छ.संभाजीनगर/ प्रतिनिधी -  शहरातील विवेकानंद महाविद्यालयात दि. १ जून रोजी पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. .हा पदवीदान समारंभ छ.संभाजीनगर येथील राज्य कर उपायुक्त  चंद्रशेखर बोर्डे व नामांकित  न्यूरोलाॅजिस्ट डाॅ.अब्दुल माजिद यांच्या शुभहस्ते संपन्न  झाला .यावेळी डॉ. माजीद यांनी कविता, शेरशायरी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणात्मक संदेश दिला.त्यांच्या कवितांनी उपस्थितांची दाद मिळविली.''विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुन नियोजनपूर्वक वाटचाल केली तर यश सहज प्राप्त होते" असे डाॅ.माजिद यांनी सांगितले.
तर दुसरे प्रमुख पाहुणे चंद्रशेखर बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचे महत्व हा विषय केंद्रस्थानी ठेऊन व्याख्यान दिले. ते म्हणाले की, "स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात नकारात्मकता न ठेवता यश आपलेच आहे,अशी खूणगाठ बांधून प्रयत्न केले तर शंभर टक्के यश प्राप्त होते ".पुढे  ते म्हणाले की,"मराठवाडा हा गुणवत्तेचा खजिना आहे, तो फक्त आपणास माहीत नाही.
 तसेच मला अभिमान वाटतो की मीं आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, विवेकांद महाविद्यालयामुळे आम्ही घडलो."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.दादाराव शेंगुळे हे होते.डाॅ.शेंगुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख वाचून दाखविला. विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे,"ऊठा,जागे व्हा,ध्येय प्राप्तीपर्यंत चालत रहावे.प्रयत्न हाच परमेश्वर आहे."  असा विद्यार्थ्यांना संदेश दिला. 
महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या व शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजीनगर यांची पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानाने पदवीदान करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी संसद  प्रतिनिधी डाॅ.वसंत निरस यांनी केले .डाॅ.शर्मिष्ठा ठाकूर यांनीसूत्रसंचालन आणि आभार मानले. उपप्राचार्या डाॅ.अरुणा पाटील व डाॅ.रवींद्र शिंदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.


आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा