छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण आग गोडाऊन जळून खाक

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण आग  गोडाऊन जळून खाक

संभाजीनगर /प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसर पुन्हा एकदा आगीच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. हिनानगर भागात मंडप डेकोरेशन साहित्य साठवून ठेवलेल्या गोडाऊनमध्ये अचानक आग भडकली. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाची वाटणारी ही आग काही वेळातच मोठ्या प्रमाणात पसरली आणि धुराचे लोट दूरवरून दिसू लागले.


घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील नागरिकांनीही सतर्कता बाळगत सुरक्षित अंतर राखले. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
मात्र, गोडाऊनमध्ये साठवलेल्या डेकोरेशन साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून पूर्णपणे आग विझल्यानंतरच नुकसानाचा अचूक अंदाज स्पष्ट होईल.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा